Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरेंमहाराष्ट्र

हिंगणवेढा येथील झालेल्या अपघातात पाच पैकी तीन जागीच ठार तर दोन जखमी ट्रक चालक फरार.

हिंगणवेढा येथे ट्रकचा व टाटा सुमो चा समोरासमोर येऊन अपघात झाला. त्यात पाच पैकी तीन जागीच ठार झाले व दोन जखमी असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ट्रक चालक हा फरार झाल्याचे समोर आले आहे.

नाशिक प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : हिंगणवेढे शिवारात खोब्रागडे फार्म हाऊस जवळ गुरुवारी (२२) सकाळी ट्रक व टाटा सुमो यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघा युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अजय भांगरे (वय २८), सचिन राजाराम मोरे (वय २५) , गणेश किरण गारे (वय २५) चे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

       अपघाताची माहिती मिळताच या ठिकाणी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. 

          अपघातातील जखमींवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. टाटा सुमो (एमएच १५ सीडी ७६६८) व ट्रक (एमएच १५ बीजी १३३६) या वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, दोघांचा जागेच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!