
नगरपरिषद कार्यालय अहमदपूर मुख्याधिकारी साहेब दिनांक 8-2- 2024 रोजी लहुजी शक्ती सेना अहमदपूर यांच्या वतीने..
1) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या कामास वेगाची गती देण्यात यावी..
2) अण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक सभागृह व सार्वजनिक शौचालय जागा उपलब्ध करून देऊन बांधकाम करून देण्यात यावे..
3) मातंग समाजाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने समशान भूमीच्या जागेत वाढ करून देण्यात यावी..
4) अहमदपूर इंदिरानगर येथील न .प . अडीच एकर च्या जागेत गेली 25 ते 30 वर्षे झाले या जागेत अहमदपूर येथील नागरिक वास्तव्यास आहेत तरी त्यांना अतिक्रम कायम करून घरकुलाचा लाभ घ्यावा व त्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यात यावे..
अशा विविध मागण्याचे लहुजी शक्ती सेने च्या वतीने निवेदन मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद अहमदपूर यांच्याकडे देण्यात आले आहे तरी मा. साहेबांनी लवकरात लवकर या मागण्यास न्याय मिळवून द्यावा ही विनंती..

