Site icon desh 24×7

आमदार हिरामण खोसकर काँग्रेसमध्येच

नाशिक, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर :  माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ अमदार अशोक चव्हाण यांधी सोमवारी (दि १२) पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासमवेत पक्षत्याग करणाऱ्यांमध्ये इगतपुरी -त्र्यंबकेश्वरचे कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली. फरंतू खोसकरज्ञमे केनियात अभ्यास दौऱ्यावर असून, त्यांच्या पक्षांतराबाबत सद्यस्थितीत काहीही तथ्य नसल्याचे सांगतानाच येत्या १५ फेब्रुवारीला मायदेशी परतल्यावर खोसकर आपली भूमिका स्पष्ट करतील. असा खुलासा एका पत्रकान्वये खोसखर यांच्या कार्यालयातून करण्यात आला.
     अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यासमवेत कॉंग्रेसचे ११ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. तृयात नाशिक जिल्ह्यातील कॉंग्रेसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांचेही नाव पुढे आले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणातही खळबळ उडाली. याबाबत हिरामण खोसकर यांचे सुपुत्र वामन खोसकर यांचवयाशी संपर्क साधला असता त्यांनी या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत आमदार खोसखर हे परदेशातून परतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करतील असे सांगितले. या पत्रात म्हटले आहे, आमदार खोसकर हे ५ फेब्रुवारीपासून राज्य शासनाच्यावतीने होत असलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी केनिया देशात गेले आहे. त्यांच्या पक्षांतराबाबतची चर्चा होत आहे; परंतु सद्यस्थितीत तसे काहीही नाही. खोसकर हे १५ फेब्रुवारीला मायदेशी परतणार आहेत.

Exit mobile version