Site icon desh 24×7

दुचाकीस्वार अपघातात ठार

मालेगाव । ९/२/२०२४

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर

महामार्गाने भरधाव वेगाने जाणार्या एका अज्ञात वाहने कट मारल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला. सवंदगाव शिवारात झालेल्या

या दुर्घटनेत अन्य एकजण गंभीर जखमी झाला.

दिलीप रामचंद्र शेजवळ (५१) रा. करगाव ता. चाळिसगाव हे आपले सहप्रवाशी दिलीप चिंतामण मुलमुले यांचेसह एमएच १९ सीएच ०६३७ या दुचाकीने चाळिसगाव फाटा कडे जात होते.

याच दरम्यान त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात  वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. या मुळे दिलीप शेजवळ यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व यात दिलीप दुचाकी घसरली.

शेजवळ हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. तर दिलीप मुलमुले यांना गंभीर इजा झाली. यासंदर्भात राहूल दिलीप मुलमुले रा. करगाव ता. चाळिसगाव याने पवारवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी अपघातानंतर वाहनांसह पसार झालेल्या अनोळखी वाहनचालका विरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल केला आहे. सहा. पो. नि. पवार हे तपास करीत आहेत.

 

Exit mobile version