Site icon desh 24×7

प्रेस नोट ‘महाज्योती’तर्फे मोफत एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेण्यात yenar आहे.

प्रेस नोट
‘महाज्योती’तर्फे मोफत एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण
घेण्यात yenar आहे.
• संकेतस्थळावर अर्ज प्रक्रियेला सुरुवात
नागपूर, दि. 28 : महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्गातील (एस.बी.सी) विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. सन 2024-25 या वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) संयुक्त गट ब व क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया 27 जूनपासुन सुरू केलेली आहे. 
अर्ज महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत. महाज्योतीमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 
प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Exit mobile version